जळगाव प्रतिनिधी । घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर माजीमंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर आणि चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह इतर आरोपींच्या जामिन अर्जावर पुढील सुनावणी आता १ ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
जळगाव येथे नऊ जागांवर बांधण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा गुन्हा धुळयातील विशेष न्यायालयात सिध्द झाला होता. न्यायाधीश सृष्टी निळकंठ यांनी निकाल देताना सुरेश जैन, राजेंद्र मयुर, प्रदीप रायसोनी, जगन्नाथ वाणी यांच्यासह ४९ आरोपींना वेगवेगळया कलमांमध्ये सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. दंडाची एकूण रक्कम १८१ कोटी २४ लाख ५९ हजार एवढी आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आता उच्च न्यायालयात निकालास आव्हान देण्यासाठी धडपड सुरु आहे. औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज दाखल करून घेत असून पुढील सुनावणी 26 सप्टेंबरला रोजी ठेवली होती. परंतू तत्पूर्वीच विशेष सरकारी वकील अमोल सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळे आजची सुनवाई होणार की नाही? याबाबत शंकाच होती. त्यानुसार आता पुढील सुनावणी १ ऑक्टोंबरला होणार आहे.