जळगाव प्रतिनिधी । जळगाव न.पा. घरकुल घोटाळ्याचा निकाल लवकरच धुळे न्यायालयात जाहीर केला जाणार आहे. या घोटाळ्यात दोन माजी मंत्र्यांसह अनेक आजी-माजी नगरसेवक, विद्यमान आमदार, माजी नगराध्यक्ष व माजी महापौर यांचा समावेश असल्याने शहरात निकालाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या सर्व आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
आरोपींचे नावे :-
प्रदीप रायसोनी, राजेंद्र मयुर, पी.डी.काळे, जगन्नाथ वाणी, माजी मंत्री सुरेश भिकमचंद जैन, माजी मंत्री गुलाबराव बाबुराव देवकर, अशोक काशिनाथ सपकाळे, चुडामण शंकर पाटील, अफजल खान रऊफ खान पटवे, शिवचरण कन्हैयालाल ढंढोरे, आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, सरस्वती रामदास कोळी, चंद्रकांत उर्फ आबासाहेब कापसे, विजय रामदास वाणी, अलका अरविंद राणे, पुष्पा प्रकाश पाटील, डिगंबर दौलत वाणी, लक्ष्मीकांत उर्फ कांती तुकाराम चौधरी, अजय राम जाधव, वासुदेव परशुराम सोनवणे, सुभद्राबाई सुरेश नाईक, इकबालोद्दीन पीरजादे, शांताराम चिंधु सपकाळे, देविदास बळीराम धांडे, अरुण नारायण शिरसाळे, भगतराम रावमल बालाणी, चत्रभुज सोमा सोनवणे, दत्तु देवराम कोळी, डिंगबर दलपत पाटील, कैलास नारायण सोनवणे, अशोक रामदास परदेशी, लिलाधर नथ्थु सरोदे, पांडुरंग रघुनाथ काळे, लता रणजीत भोईटे, मंजुळा धमेंद्र कदम, निर्मला सुर्यकांत भोसले, विमल बुधो पाटील, साधना राधेशाम कोगटा, सुधा पांडुरंग काळे, सिंधु विजय कोल्हे, अलका नितीन लढ्ढा, मुमताजबी हुसेन खान, सुनंदा रमेश छाडेकर, मीना अमृतलाल मंधान, रेखा चत्रभुज सोनवणे, मीना अनिल वाणी, पुष्पलता शालीग्राम अत्तरदे, विजय पंडीतराव कोल्हे, सदाशिव गणपत ढेकळे यांचा समावेश आहे.
सात मयत, एक फरार
घरकुल घोटाळ्यात गुन्हा दाखल असलेल्या एकूण 56 आरोपींपैकी आतापर्यंत महेंद्र तानकु सपकाळे, शालिग्राम मुरलीधर सोनवणे, भागिरथी बुधो सोनवणे, दिलीप पंडीतराव कोल्हे, अर्जुन शिरसाळे, शरद सुकलाल सोनवणे, राजू सोमा सोनवणे हे मयत झाले असून प्रमिला भागवत माळी फरार आहेत.