Home क्राईम घरासमोरील ईलेक्ट्रिक मीटरची चोरी

घरासमोरील ईलेक्ट्रिक मीटरची चोरी

0
32

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कानळदा रोडवरील त्रिभूवन कॉलनीतून एकाच्या घराचे इलेक्ट्रीक मीटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिपाली हनुमंत जाधव (वय-३९) रा. त्रिभूवन कॉलनी, कानळदा रोड, जळगाव ह्या अपपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २ जुलै रोजी रात्री ९.३० वाजेच्या रात्री झोपलेले असतांना मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या भिंतीला लावलेले ईलेक्ट्रिक मीटर चोरून नेल्याचे रविवारी ३ जुलै रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले. याबाबत महिलेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहे.


Protected Content

Play sound