सोशल मिडीयावर तरूणीशी झालेली ओळख ‘त्या’ तरूणांना पडली महागात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील जवळच असलेल्या एका  गावातील तरुणीची सोशल नेटवर्कवर उत्तर प्रदेशातील तरुणासोबत ओळख झाली असता या ओळखीचा गैरफायदा घेत सदर तरुणाने थेट उत्तर प्रदेशातून तरुणीचे यावल तालुक्यातील गाव गाठले. या ठिकाणी तरूणाने व त्याच्या सोबत आलेल्या तीन तरूणांनी तरूणीच्या कुटुंबाशी वाद घातल्याने अखेर त्यांच्याविरूध्द यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबतची मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावातील तरुणीची उत्तर प्रदेशच्या तरूणांनी तरूणी व तिच्या कुटुंबाशी वाद घातला. ही बाब गावातील नागरिकांच्या निदर्शनास आल्याने गावातील नागरिकांनी त्या चौघांचा चांगलाच समाचार घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून  गावातील एका तरुणीची ओळख उत्तर प्रदेशातील जौनपुर जिल्ह्यातील सहागंज तालुक्यातील जरनापुर टपरी येथील राहणाऱ्या एका तरूणाशी ओळख झाली. ओळखीनंतर ते सोशल मीडियावर एकमेकांशी बोलू लागले आणि यातून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून तो मुलगा व त्याचे तीन मित्र असे चार जण शनिवारी थेट त्या तरूणीच्या गावात जाऊन तरुणीच्या घरीच पोहोचले.

सदरच्या या सोशल मीडिया ओळख झालेल्या त्या तरुणाला पाहून तरुणी आवाकच झाली व या चौघांनी या तरुणीशी आणि तिच्या आईशी वाद घालायला सुरुवात केली. सदर अनोळखी मुले काय वाद घालत आहे हे पाहून गावातील नागरिकांची गर्दी जमली आणि त्यांनी या चौघांना चांगलाच चोप दिला व नंतर त्यांना यावल पोलीस ठाण्यात आणले. यावल पोलीस ठाण्यात तरुणीची आईने उत्तर प्रदेशातील तरुणाविरुद्ध तक्रार दिली आहे.

Protected Content