गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला अटक

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात कंबरेला पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला रामानंद नगर पोलीसांनी गुरूवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता अटक केली. याप्रकरणी सायंकाळी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम ऊर्फ मणी दिनेश अहीरे (वय-२७, रा.सिंद्धार्थ हौसिंग सोसायटी) असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गिरणा टाकी परिसरात एक गुंड कंबरेला पिस्तूल लावून दहशत माजवत असल्याची गुप्त माहिती निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी गुरूवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सहाय्यक निरीक्षक विठ्ठल पाटिल, हेमंत कळसकर, संजय सपकाळे, इरफान मलीक, सुशील चैाधरी अशांच्या पथकाने गिरणाटाकी परीसर गाठून संशयित शुभम उर्फ मणी दिनेश अहिरे याला अटक केली. संशयित तरुणाला हटकल्यावर त्यांची अंगझडती घेतल्यावर त्याच्याजवळ गावठी पिस्तूल आढळून आले असून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हेमंत कळसकर हे करीत आहे.

Protected Content