गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

106315 cuiaoveqoj 1564030941

पुणे (वृत्तसंस्था) शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखांविरोधात तपासयंत्रणेकडे सबळ पुरावे उपलब्ध असल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हणत पुणे सत्र न्यायालयाने नवलखा यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.

 

पुणे सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एस.आर. नवानदार यांनी 7 नोव्हेंबर रोजी राखून ठेवलेला आपला निकाल आज जाहीर केला आहे. नवलखा हे केवळ बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्य नव्हेत तर त्यातील एक सक्रीय नेता आहेत हे पुराव्यातून समोर येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे. गौतम नवलखा यांनी काश्मिरमध्ये जाऊन फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याचे पुरावेही कोर्टात सादर करण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांशी चर्चेत वेळोवेळी सरकराची मदत केल्याचा दावा करणा-या गौतम नवलखा यांनी नेहमीच नक्षलवाद्यांची बाजू घेतली आहे, असा आरोप राज्य सरकारने केला आहे. छत्तीसगडमधील बस्तरमध्ये साल 2017 मध्ये झालेल्या नक्षलवादी हल्याच्या कटातही नवलखांचा सहभाग तसेच नक्षलवादी विचारांच्या समूहाचे नवलखा सदस्यही होते त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Protected Content