Home Cities जळगाव जळगावात शिवसेनेचा धमाका; गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड !

जळगावात शिवसेनेचा धमाका; गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड !

0
429

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | छाननीच्या दिवशी भाजपच्या उज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आता शिवसेनेचे उमेदवार तथा आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र गौरव सोनवणे यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ॠसविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

छाननीच्या दिवशी भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्वला मोहन बेंडाळे यांच्या विरोधात एकही अर्ज नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. यातून भाजपने महापालिकेत खाते उघडले होते. या पाठोपाठ आता शिवसेनेनेही महापालिकेत धमाकेदार एंट्री केली आहे. प्रभाग क्रमांक 18-अ मधून गौरव चंद्रकांत सोनवणे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

आजपासून अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्थात, या माध्यमातून महापालिकेत शिवसेनेने देखील खाते उघडले आहे


Protected Content

Play sound