नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी घरगुती गॅस सिलिंडरबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे.
वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर १९ रुपयांनी महागला आहे तर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मे-जूनपासून सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतींवर परिणाम होत असल्याने पेट्रोलियम कंपन्या एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेत आहेत. त्यानुसार आता दिल्लीत १४.२ किलोचा गॅस सिलिंडरचा दर आता ७१४ रुपये झाला आहे. मुंबईत ग्राहकांना घरगुती गॅससाठी ६८४ रुपये मोजावे लागतील.