Home क्राईम गिझरमधील गॅस लीक ; 15 वर्षीय मुलीचा गुदमरुन मृत्यू

गिझरमधील गॅस लीक ; 15 वर्षीय मुलीचा गुदमरुन मृत्यू

0
57

 

suside

मुंबई (वृत्तसंस्था) आंघोळ करत असतांना अचानक गीझरमधील गॅस लीकीज झाल्याने 15 वर्षीय मुलीचा बाथरुममध्ये गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गोराई, बोरिवली येथे घडली आहे. विशेष म्हणजे वाढदिनीच या तरुणीचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

ध्रुवी गोहिल ही तरुणी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आंघोळीला बाथरुममध्ये गेली. परंतू एक तास झाल्यावरही ध्रुवी बाथरुममधून बाहरे न आल्यामुळे घरातल्यांनी बाथरुमचा दरवाजा तोडला. यावेळी ध्रुवी बाथरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तर बाथरुममध्ये चार फूटापर्यंत काचेवर गॅस पसरलेला होता. ध्रुवीचा पायही गरम पाण्याने भाजला होता. दरम्यान, ध्रुवीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू 24 तासांनतर ध्रुवीचा मृत्यू झाला.


Protected Content

Play sound