जळगाव (प्रतिनिधी) शहरातील फातेमा नगरमधील लेक-व्ह्यू कॉलनीत ३२ खोली भागात राहणाऱ्या मुस्तुफा खान (पेंटर) यांच्या घरी आज (दि.९) सायंकाळी रमजाननिम्मित रोजा (उपवास) सोडण्यासाठी इफ्तारचे जेवण बनवत असतांना वाढलेल्या तापमानामुळे गॅसच्या शेगडीचा स्फोट होवून ती वाकून खराब झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. केवळ त्यांच्या किचनमधील सामान व जेवण अस्ताव्यस्त झाले होते.
जळगावात जेवण बनवताना गॅस शेगडीचा स्फोट
6 years ago
No Comments