Home Cities जळगाव शहरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करुन कचरा संकलन

शहरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करुन कचरा संकलन

0
29

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’ निमित्त ‘स्वच्छता मोहिमे’चे आयोजन करुन कचरा संकलित करून कचरा पेटीत टाकण्यात आला.

आज मंगळवार, दि.१६ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील एककांनी आप-आपल्या परिसरामध्ये ‘स्वच्छता मोहिमे’चे आयोजन करुन कचरा संकलित केला आणि तो कचरा कचराकुंडीत टाकला.

प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमास राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलेश चौधरी, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक हनवते यांचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound