यावल प्रतिनिधी । तालुक्यात कोरोना विषाणुच्या संकटात यंदा गणपती बाप्पाचे आगमन व स्वागत अगदी साधेपणाने मंगलमय वातावरणात झाले.
देशावर आलेल्या महामारी संकटाच्या पार्श्वभुमीवर शासनाने ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन करूनच श्रीगणेशभक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा केले .दरम्यान आज गणेश चतुर्थी असल्याने यावल शहरातील प्रमुख बाजारपेठेत पुजा अर्चनेचे साहीत्य व गणपती बाप्पाची मुर्ती खरेदीसाठी अबालवृद्धा पासुन तरूणांची मोठी गर्दी दिसुन आली , बाजारपेठेत शासनाने दिलेल्या आदेशानुसारच कमी उंची असलेली श्रीगणेशाची मोठया प्रमाणात मुर्ती विक्रीसाठी आणल्याचे चित्र दिसुन आले . पोलीस प्रशासनाच्या माहीतीनुसार यावल पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकुण ६३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी व१ खाजगी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शासकीय नोंदणी करण्यात आल्याची माहीती मिळाली आहे . सर्व गणेशोत्सवच्या मंडळ कार्यकर्त्यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासन आदेशाची शिस्त पाळत नियमांची काटेकोर अमलबजावणी करावी असे आवाहन यावलचे प्रभारी पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी केले आ