चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातून अवैधपणे गांजाची वाहतूक करणारे वाहन शनिवारी १५ जून रोजी रात्री ११ वाजता चाळीसगाव शहर पोलीसांनी पकडले असून ५० किलो ३१५ ग्रॅम वजनाचा सुमारे १० लाख ६ हजार तीनशे रुपयांचा गांजा व वाहन हस्तगत केला आहे. याप्रकरणी अशोक भरतसिंग पाटील (वय-54, प्लॉट नं.38, शिक्षक कॉलनी, चाळीसगाव) यास अटक केली असून चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील शिक्षक कॉलनीतून अवैधपणे गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने शनिवारी १५ जून रोजी रात्री ११ वाजता सापळा रचून कारवाई केली. या वाहनातून १० किलो गांजा व त्याच्या घरातून ४० किलो ३१५ ग्रॅम हसा एकुण सुमारे १० लाख ६ हजार रूपयांचा गांजा आणि वाहन पोलीसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी अशोक भरतसिंग पाटील रा.शिक्षक कॉलनी, चाळीसगाव याला अटक केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई चाळीसगाव शहर निरीक्षक संदीप पाटील, निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, फौजदार सुहास आव्हाड, हवालदार सुभाष घोडेस्वार, हवालदार राहुल भीमराव सोनवणे, हवालदार विनोद विठ्ठल भोई, नाईक महेंद्र प्रकाश पाटील, कॉन्स्टेबल आशुतोष दिलीप सोनवणे, कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर हरी पाटोळे, पवन कृष्णा पाटील, विजय रमेश पाटील, ज्ञानेश्वर विलास गीते, मनोज मोरसिंग चव्हाण, राकेश मुरलीधर महाजन, रवींद्र निंबा बच्छे, महिला शिपाई स्नेहल मांडोळे आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व कॉन्स्टेबल उज्वलकुमार म्हस्के करीत आहेत.