गांजा तस्करीचा पर्दाफाश, पोलिसांनी जप्त केला मोठा साठा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरुण तलावाच्या परिसरात एमआयडीसी पोलिसांनी गांजाची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून साडेपाच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मेहरुण तलाव परिसरातील जे.के. पार्क भागातील उद्यानात एक व्यक्ती गांजाची वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उद्यानात पाहणी केली असता, एक व्यक्ती मोटारसायकलवर गांजा घेऊन उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी मुकेश विष्णू अभंगे (वय ४२, रा. कंजरवाडा, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एका मोठ्या पिशवीत साडेपाच किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक विभागाला बोलावून नमुने तपासले. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ४० ते ५० हजार रुपये असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आले आहे.

Protected Content