मुंबई प्रतिनिधी । केरळविरुद्धच्या रणजी सामन्यात जसप्रीत बुमराह गुजरात संघाकडून खेळणार होता. पण अखेरच्या क्षणी तो संघातून बाहेर पडला. दुखापतीतून बाहेर आलेल्या बुमराहसाठी गांगुलीने बीसीसीआयच्या एका नियमात बदल करत ‘हा’ निर्णय घेतला.
सुरतमधील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर गुजरात विरुद्ध केरळ यांच्यातील रणजी स्पर्धेतील सामना सुरु झाला आहे. रणजी स्पर्धेतील या सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते. याचे कारण म्हणजे भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार होता. पण अखेरच्या क्षणी बुमराह या सामन्यातून बाहेर झाला होता. चार महिन्यापूर्वी दुखापत झालेल्या बुमराहची श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. लंकेविरुद्ध पाच जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याआधी बुमराहला रणजी सामना खेळण्यास सांगण्यात आले होते. पण बुमराहला स्वत:ला अधिक गोलंदाजी करायची नव्हती. यासंदर्भात तो बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला सांगितले होते. त्यानंतर गांगुलीने बुमराहसाठी नियमात बदल करत त्याला विश्रांती करण्याची परवानगी दिली.