मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

मुंबई (वृत्तसंस्था) मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला डांबून ठेवत, चार नराधमांनी तिच्यावर बारा तास आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडलीय.

 

१७ वर्षीय पीडित मुलगी शनिवारी (दी. 16) पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास तिच्या मित्रांसोबत आचोले तलावावर मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. यावेळी आरोपी अमित बटला याने तिला चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने रिक्षात बसवले. पीडित मुलीसोबत असलेल्या मित्रांनी याचा विरोध केला. मात्र, त्यांनाही आरोपींनी धमकावले. चारही आरोपींनी पीडित मुलीला वैती वाड़ी परीसरातील मोहम्मदी बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन डांबून ठेवले. त्यानंतर या नराधमांनी तब्बल 12 तास तिच्यावर आळी-पाळीने सामूहीक बलात्कार केला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वाजेच्या सुमारास पिडीत तरुणी आरोपींच्या तावडीतून पळ काढण्यात यशस्वी झाली. दरम्यान, पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Protected Content