Home Cities एरंडोल सबमर्सिबल आणि सोलर पंप चोरणारी टोळी जेरबंद

सबमर्सिबल आणि सोलर पंप चोरणारी टोळी जेरबंद


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल पोलिस स्टेशन हद्दीत ट्रक मधून सबमर्सिबल आणि सोलर पंप चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता नागदुली गावाजवळील पदमालय फाट्याजवळून अटक केली आहे. एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातून तब्बल २ लाख ३५ हजार रुपये किमतीचे पंप चोरीला गेले होते. ही घटना उमरदे गावाजवळ रस्त्यावर घडली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी विशेष पथकाची स्थापना केली होती.

तांत्रिक माहितीने गुन्ह्याचा छडा
या पथकाने समांतर तपास सुरू केला आणि गोपनीय माहिती तसेच तांत्रिक बाबींचा वापर करून या गुन्ह्याचा छडा लावला. तपासादरम्यान, आकाश लालचंद मोरे (रा. मुगपाठ, ता. एरंडोल) याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी २५ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी आकाश मोरे याला नागदुली गावाजवळील पदमालय फाट्यावरून ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा भरत वावुराव बागुल, पृथ्वीराज रतीलाल पाटील आणि पंकज रवि बागुल यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.

तीन आरोपींना अटक
आकाश मोरेच्या कबुलीवरून पोलिसांनी त्याचे तिन्ही साथीदार, भरत बागुल (वय ३२, रा. केवडीपुरा, एरंडोल) आणि पृथ्वीराज पाटील (वय २०, रा. वरखेडी, एरंडोल) यांना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


Protected Content

Play sound