पाचोरा, प्रतिनिधी | अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या विभागीय अध्यक्षपदी येथील ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’चे प्रतिनिधी गणेश जनार्दन शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख यांच्या आदेशाने केंद्रीय सदस्य तथा प्रदेश सचिव लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात जळगांव धुळे नंदुरबार विभागासाठी अध्यक्षपदी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे हे पत्रकारिता क्षेत्रात निर्भीड वृत्तांकन करण्यासाठी तालुक्यात व जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्य बघता प्रदेश सचिव, आबा सुर्यवंशी यांनी त्यांची निवड केली आहे. शहर व तालुका अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.