मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एलआयसीचे विमा एजंट गणेश विठ्ठल नाथजोगी यांनी एलआयसी कडून एमडीआरटी या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच ग्राहकांना अतिशय दर्जेदार सेवा पुरवून आपले टार्गेट पूर्ण करणार्यांना एमडीआरटी पुरस्काराने गौरविण्यात येते. या अनुषंगाने गणेश विठ्ठल नाथजोगी यांना सावदा शाखेचे शाखाधिकारी सचिनदेव सूर्यवंशी यांच्याहस्ते पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
एमडीआरटी पुरस्काराने आपल्या कामाची पावती मिळाली असतांनाच आपल्याला नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा देखील मिळाली आहे. यामुळे आगामी काळात देखील याच प्रकारे उत्तम कामगिरी करणार असल्याचे प्रतिपादन गणेश नाथजोगी यांनी याप्रसंगी केले.
दरम्यान, गणेश नाथजोगी यांना ही कामगिरी करण्यासाठी विकास अधिकारी भूषण चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेश नाथजोगी यांचे शाखाधिकारी सचिन सूर्यवंशी, प्रशासकीय अधिकारी गुलाबराव तायडे, स्नेहा दुधानी, राजू तडवी, विकास अधिकारी भूषण चौधरी यांच्यासह कर्मचारी आणि विमाधारकांनी अभिनंदन केले आहे.