गांधी रिसर्च फाउंडेशनच्या युवा शिबिराला प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी | येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने युवा शिबिरास प्रारंभ करण्यात आला आहे.

गांधी विचार संस्कार श्रृंखलेअंतर्गत गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे १२ वी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी १४ ते १७ जुलै या दरम्यान ऑनलाईन शिबिर आयोजित करण्यात आले. गुजरात विद्यापीठ, अहमदाबादचे माजी कुलगुरू, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी या शिबिराचे उदघाटन करून माझ्या व्यक्तिमत्व विकासात महात्मा गांधी कुठे मदत करु शकतातफ या विषयावर सुसंवाद साधला. ऑनलाईन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे २०० पेक्षा अधिक शिबिरार्थींनी नोंदणी केली आहे.

दरम्यान, या शिबिरास सहभागी होण्यासाठी https:/forms.gle/t2FSEWWWpBhB9aNLA लिंकवर आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. गांधी विचार संस्कार श्रृंखलेअंतर्गत १२ वी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सकाळी ८ ते ९.४५ दरम्यान खास ऑनलाईन शिबिर आहे. शिबिरात आजसकाळी ८ वाजता महात्मा गांधी : समज-गैरसमज या विषयावर वडोदरा येथील डॉ. विरल देसाई सुसंवाद साधतील. १७ जुलैला शिबिराच्या समारोपात महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांचा मुक्त संवाद होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Protected Content