पाचोरा नंदू शेलकर । भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत बीपीसीएल कंपनीतर्फे “डिझेल ॲट युवर डोअर स्टेप” या उपक्रमाचा शुभारंभ शहरातील श्री गजानन पेट्रोलियम पंप येथे नुकतेच कंपनीचे पी.एस. रवी यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमा अंतर्गत ग्राहकाच्या घरापर्यंत डिझेल पुरवणाऱ्या दुचाकीला हिरवी झेंडी सुरूवात केली. यावेळी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी के. रवी, बायो गॅस प्रोजेक्ट्चे संजीव अग्रवाल, तसेच हायवे रिटेलिंग रिटेलचे डी.जी.एम. गौरव आणि रिटेल वेस्ट विभागाचे भगदीकर, फ्यूल हमसफ़र, राज्याचे व्यवस्थापक मितेश जैन यांचेसह महाराष्ट्र व गोवा राज्यातील रिटेलचे मुख्य रामन मलीक, हायवे रिटेलिंगचे जी.एम. अनुप तनेजा या मान्यवरांसह महाराष्ट्रातील बीपीसीएल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
श्री गजानन पेट्रोलियम व श्री गजानन उद्योगसमूहातर्फे डीलर माजी नगरसेविका लता राजाराम सोनार, राजाराम सोनार, युवा उद्योजक प्रमोद सोनार, डॉ. दिनेश सोनार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ग्रामीण भागातील शेतकरी आरोग्य सेवा व शैक्षणिक सेवा यांना ज्यांना लागणारे इंधन त्यांच्या त्यांच्या कार्य स्थळापर्यंत पोहचवून शेती, आरोग्य, शिक्षण यासह अन्य लोकोपयोगी वाहने व यंत्रे यांना गतिशील ठेवण्याचा भारत सरकारचा उद्देश आहे. या अंतर्गत शेती मशागत करणारे ट्रॅक्टर व शेती उपयोगातील यंत्रे यांचे इंधन संपल्यावर शेती मशागतीची कामे बंद पडतात. केवळ एका फोन कॉलवर संबंधित शेतकऱ्याला त्याच्या शेतीयंत्रा पर्यंत आवश्यक डिझेल पोहोचवण्यात येईल. या सेवेसाठी कोणताही अतिरिक्त शुल्क किंवा अधिभार लावण्यात येणार नाही अशी ही योजना आहे. ग्रामीण भागातील जनरेटरवर चालणारे रुग्णालये, ऑपरेशन थिएटर, रुग्णवाहिका, शैक्षणिक बसेस, शेती व्यवसायातील सर्व प्रकारची यंत्रसामुग्री यांना डिझेल अँट युवर डोअर स्टेप चा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने जाहीर केलेली ही योजना भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीने अमलात आणली. विशेषतः महाराष्ट्रातील पाचोरा सारख्या ग्रामीण भागातून या योजनेचा शुभारंभ होत आहे. पाचोरा येथील श्री गजानन पेट्रोलियम पंपा पासून या योजनेला सुरुवात होत असल्याने खानदेश सह संपूर्ण महाराष्ट्रातून बीपीसीएल कंपनीचे कौतुक होत आहे. सेल्स व सर्व्हिस मध्ये श्री गजानन पेट्रोलियम सदैव अग्रस्थानी आहे. बी.पी.सी.एल. कंपनी च्या सर्व ग्राहकोपयोगी योजना उत्तमरित्या राबवून गुणवत्ता, सचोटी व सेवा पुरवणारे प्रमोद राजाराम सोनार यांचा मान्यवरांनी यावेळी गौरव केला. या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी पाचोरा भडगाव तालुक्यातील ग्राहकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
यावेळी बी.पी.सी.एल. चे टेरिटरी मॅनेजर अभिजीत चव्हाण, टेरेटरी समन्वयक प्रणय मोटे, इंजीनियरिंग ऑफिसर प्रितम सूर्यवंशी व जळगाव जिल्ह्याचे सेल्स ऑफिसर अमुल्य धुरीया यांची विशेष उपस्थिती होती. या यशस्वीतेसाठी श्री. गजानन पेट्रोलियमचे मॅनेजर भूषण वाडेकर, तसेच कर्मचारी अनिकेत मिस्तरी, सागर शिंदे, यशवंत सोनवणे, सचिन तेली, सिद्धार्थ सोनवणे, कुलदीप घोडेस्वार, दिपक मिस्तरी, प्रकाश मोरे, तोताराम घोडेस्वार, व वाल्मिक पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.