गावठी हातभट्टीची दारु विक्रेता गजाआड; गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात एका घराच्या आडोशाला प्लास्टिकच्या कॅनमधून गावठी हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्यावर रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत गावठी बनावटीची दारूची कॅन जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २० जुलै रोजी दुपारी ४ वाजता दारू विक्रेत्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील हरिविठ्ठल नगरातील नवनाथ चैकात एका घराच्या आडोशाला एक जण गावठी हातभट्टीची दारु विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी लागलीच पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, राजेश चव्हाण, भरत चौधरी यांचे पथक तयार करुन रवाना केले. पथकाने गुरूवारी २० जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता कारवाई केली. या कारवाईत पथकाने भिकन आधार पवार (वय ४१, रा. नवनाथ चौक हरिविठ्ठल नगर) याला ताब्यता घेतले. त्याच्याकडून ३५ लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी संशतियाविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content