Home राजकीय गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येणार नाहीत : प्रकाश...

गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येणार नाहीत : प्रकाश आंबेडकर


अकोला (वृत्तसंस्था) नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा तीन लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाहीत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

 

अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अ‍ॅड. आंबेडकरांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युती व आघाडीच्या भूमिकेवर चौफेर टीकास्त्र सोडले. नितीन गडकरींचा पराभव अटळ असल्याचा दावा त्यांनी केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आदिवासी, हलबा, मुस्लीम, बौद्ध आदी भाजपच्या विरोधात आहेत. आदिवासींवर अन्याय झाला. त्यामुळे नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा तीन लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound