जळगाव प्रतिनिधी । सरकारी नोकरांच्या सहकारी पतपेढीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आली आहे.
ग.स. सोसायटीचे अध्यक्ष विलास नेरकर व उपाध्यक्ष कैलासनाथ चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. पीठासीन अधिकारी के.पी. पाटील यांनी हा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार पतपेढीच्या सभागृहात आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड करण्यात येणार होती. तथापि, सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे ही निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आता आचार संहिता उठल्यानंतरच अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होणार आहे.