रावेर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – ग.स.सोसायटीच्या संचालकपदी रावेर तालुक्यातून निलेश पाटील यांच्या माध्यमातून प्रथमच युवा चेहऱ्याला संधी मिळाली आहे.
शिंगाडी तालुका रावेर येथील रहिवासी आणि नांदुरखेडा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले निलेश पाटील यांना जळगाव जिल्हा ग. स. सोयायटीच्या संचालकपदी प्रथमच युवा चेहऱ्याला ग.स. सभासद मतदारांनी संधी दिली आहे.
निलेश पाटील हे सर्वांशी मिळून राहणारे, अडी-अडचणीत मदतीसाठी धाव घेणारे तसेच मोठ्या जनसंपर्क आहे. तसेच त्यांचे काम करण्याचा दृष्टीकोन पाहूनच सर्व शासकीय सभासद मतदारांनी निलेश पाटील याच्या बाजूने जनादेश दिल्याने संचालक पदाचा बहुमान मिळाला आहे. त्यानुसार ग.स. सोसायटीचे प्रतिनिधीत्व करणार असून संचालक मंडळात सर्वात युवा चेहरा म्हणुन निलेश पाटील यांच्याकडे पहिले जात आहे.
यापूर्वी ते भुसावळ येथील शिक्षकांच्या पतपेढीमध्ये देखिल संचालक असून लक्षवेधी ठरलेल्या ग.स. च्या निवडणुकीत प्रगती शिक्षक सेना गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. मराठा चेहरा असलेले निलेश पाटील यांनी ५ हजार ३८२ मते मिळवून या निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे. त्यांची पत्नी देखील रावेर येथे शिक्षिका आहेत.
ही आहेत विजयाची प्रमुख कारणे
कोणत्याही निवडणुकांमध्ये जातीय समीकरण महत्वाचे असते. याचाच मराठा चेहरा असलेल्या युवा नेतृत्वाचे ग.स.संचालक निलेश पाटील यांना फायदा झाला. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नेहमी संर्पकात रहाणे फायद्याच ठरले, सामाजिक कार्यात मदत करणे, अडी-अडचणीला धावून जाणे तसेच त्यांचा दांडगा जनसंपर्कमुळे यामुळे त्याच्या यशाचा मार्ग सोपा झाला.