जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये हॉकी या खेळाचे खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा करण्यात आला.
जी.एच.रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन देशभरामध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून उत्साहात साजरा केला जात आहे. ‘त्यानिमित्ताने शारीरिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी व नागरिक यांनी आपल्या जीवनामध्ये मैदानी खेळाला महत्त्व दिले पाहिजे. विविध खेळ खेळल्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. यश-अपयश पचवण्याची ताकद व्यक्तीमध्ये येते. चांगले आरोग्य हीच सर्वांची संपत्ती आहे हे आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी दिवसभरातून किमान एक तास तरी खेळ खेळला पाहिजे.’ असे मनोगत मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी व्यक्त केले.
पाचवीची प्रग्याती मेहता हिने विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत क्रीडा दिनाचे महत्व सांगितले. यावेळी स्वीमिग, रनिंग व स्केटिंग स्पर्धा घेत क्रीडा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे समन्वय क्रीडाशिक्षक संजय चव्हाण यांनी साधले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्फिया लेहरी, आरती पाटील, संजय चव्हाण, नलिनी शर्मा, प्रशांत महाशब्दे, अमन पांडे, लीना त्रीपाटी, तस्लिम रंगरेज, सविता तायडे, तुषार कुमावत, विजया लोंढे, शुभांगी बडगुजर व आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका राजुल रायसोनी यांनी अभिनंदन केले.