भुवनेश्वर वृत्तसंस्था । फनी हे महाभयंकर वादळ ओडिशाच्या पूर्व किनार्यावर धडकले असून यामुळे मोठी हानी होण्याची भिती आहे.
हवामान खात्याने ओडिशामध्ये शुक्रवारी फनी हे वादळ धडकणार असल्याचा इशारा आधीच दिला होता. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. धोकेदायक ठिकाणच्या वस्त्यांमधील नागरिकांनी आधीच सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. अनेक रेल्वे गाड्या आणि बसेस रद्द करण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, आज सकाळी पूर्व किनारपट्टीवर फनी चक्रीवादळाने धडक दिली. प्रारंभी याचा वेग १८५ किलोमीटर प्रति-तास इतका होता. मात्र यात वाढ होत तब्बल २४० पर्यंत याचा वेग वाढल्याची माहिती हवामान खात्याने दिले आहे. या वादळामुळे मोठी वित्तीय हानी झाल्याचे वृत्त असून सकाळीच एका इसमाचा झाड पडून मृत्यूदेखील झाला आहे.