अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर बस स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल २५० लक्ष रुपये (२.५० कोटी) निधी मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली असून, या निर्णयामुळे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रभावी प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकल्पांतर्गत बस स्थानक परिसराचे संपूर्ण काँक्रिटीकरण, जलनिचरा व्यवस्थेची सुधारणा, सुशोभीकरणासाठी पेव्हर ब्लॉक बसविणे, रंगकाम तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. या कामांमुळे स्थानक अधिक स्वच्छ, आकर्षक आणि प्रवाशांसाठी सुरक्षित होणार आहे. दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असलेल्या अमळनेर बस स्थानकाला दीर्घकाळापासून दुरुस्ती व आधुनिकीकरणाची गरज होती.

अमळनेर हे अमळनेर शहर जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी व शैक्षणिक केंद्र मानले जाते. येथून ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. त्यामुळे बस स्थानकाच्या सुविधा विस्तारामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानकातील गटार व्यवस्थेची दुरुस्ती व काँक्रिटीकरणामुळे पावसाळ्यातील अडचणीही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
निधी मंजुरीबाबत प्रतिक्रिया देताना खासदार स्मिताताई वाघ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. राज्य सरकारच्या सहकार्यामुळे अमळनेरच्या विकासाला गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्थानिक नागरिक व प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, मंजूर कामांची अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करून निर्धारित कालावधीत पूर्ण करावी, अशी



