Home Cities पाचोरा वाडी शेवाळे आरोग्य उपकेंद्र इमारतीसाठी दीड कोटी लाखांचा निधी मंजूर

वाडी शेवाळे आरोग्य उपकेंद्र इमारतीसाठी दीड कोटी लाखांचा निधी मंजूर

0
65


पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे येथील वाडी आरोग्य उपकेंद्रसाठी नवीन इमारत उभारणीसाठी १ कोटी ५९ लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

या अगोदर वाडी येथे असलेले उपकेंद्र सुसज्ज इमारत व तांत्रिक बाबीं च्या अभावामुळे दुर्लक्षित झाले होते. मात्र या गटाचे कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी आरोग्यविषयक विभागाकडे नियमित पाठपुरावा करून उपकेंद्र इमारतीस मंजुरी मिळवण्यास त्यांना यश आले आहे. जि. प. सदस्य मधुकर काटे यांचे पिंपळगाव – शिंदाड गटातुन त्यांनी केलेल्या कार्याबद्दल अभिनंदन केले जात आहे.

 


Protected Content

Play sound