चोरीच्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपीला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमअयडीसीतील एका कंपनीमध्ये चोरी प्रकरणातील फरार असलेल्या संशयिताला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

आकाश उर्फ बंटी अंकुश जाधव रा. सुप्रीम कॉलनी असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, एमआयडीसीतील वीस हेक्टर येथे श्रीराम पॉलिमर्स चटई दाणा कंपनीमध्ये १३ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी २५ जानेवारी रोजी  कंपनीच्या निकिता राजेंद्र महाजन रा. मेहरुण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी उपेश ऊर्फ साई सोनाजी आठे यास अटक केली होती. त्याच्याकडून ८ हजार  ६०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला होता. तर त्याचा साथीदार आकाश उर्फ बंटी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. संशयित आकाशबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार आनंदसिंग पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे व विकास सातदिवे यांच्या पथकाने त्याला मंगळवारी सुप्रीम कॉलनी येथून अटक केली.

Protected Content