आयडीबीआय बँकेकडून जि.प. शाळेस प्रिंटर-यूपीएस भेट

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जि. प. प्राथमिक शाळा सावतर निंभोरा येथे आयडीबीआय बँक, भुसावळ यांच्या वतीने इस्कॉन कंपनीचा ऑल इन वन प्रिंटर आणि यूपीएस सप्रेम भेट म्हणून प्रदान करण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेतील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार असून, विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची मोठी मदत मिळणार आहे.

या प्रसंगी आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक श्रीपाद पुंडे, तसेच त्यांचे सहकारी स्वानंद झारे व मनीष सिन्हा विशेष उपस्थिती होते. गावच्या सरपंच सौ. साधनाताई कोळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ सपकाळे, पोलीस पाटील अरुण कोळी, तसेच अनिल कोळी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ, गणेश भाऊ कोळी, शिक्षणप्रेमी जंगलू कोळी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

शाळेचे मुख्याध्यापक जी.एम. पाटील व सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय निंभोरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री पाटील सर यांनी व्यक्त केले. आयडीबीआय बँकेच्या या सामाजिक उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.

 

Protected Content