पहूर, ता. जामनेर ( वार्ताहर ) दहावीच्या विद्यार्थ्यांनी कृतीपत्रिकेशी मैत्री करावी, अर्थात कृतीपत्रिका समजून घ्यावी, बदललेला अभ्यासक्रम आणि मुल्यमापन पद्धती विदयार्थीकेंद्री असून विद्यार्थी व पालकांनी मनातील भीती दूर करावी, असे प्रतिपादन जिल्हा इंग्लिश वेल्फेअर असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी टी.बी. पांढरे यांनी गुरुवारी येथे केले.पहूर येथे आर.टी. लेले विद्यालयात इंग्लिश लर्नर्स क्लब व इंग्लिश टिचर्स वेल्फेअर असोसिएनच्या वतीने आयोजित उद्बोधन वर्गाप्रसंगी ते बोलत होते. सुमारे सव्वातीनशे विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
पुढे बोलताना पांढरे म्हणाले की , कृतिपत्रिकेचा जास्तीत जास्त सराव करावा, वेळेचे नियोजन करावे, सूचना व प्रश्न न लिहीता केवळ उत्तरे लिहावीत. पीपीटीद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक व्ही.जी. भालेराव होते. प्रारंभी सरस्वती पुजन करण्यात आले. आर.बी.आर. कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुधीर महाजन, उर्दू मिल्लत हायस्कूलचे मुख्याध्यापक झेड.एम. पटेल, एस.एस. पाटील, शकील शहा, श्री. आगारे आदींची यावेळी उपस्थिती होती. क्लबतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष शंकर भामेरे यांनी केले तर आभार रंजना थोरात यांनी मानले.