फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विद्यार्थी विकास विभाग’ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मैत्री शिबीर’ला ३० जानेवारी रोजी दुसऱ्या दिवसाची सुरुवात थोर कथाकार व मराठी साहित्यिक प्रा. व. पु. होले यांनी मैत्री पुस्तकांशी या विषयावर मार्गदर्शन केले. पुस्तकांमुळे सुसंस्कृत माणूस घडतो, सुसंस्कृत माणसामुळे सभ्य समाज घडतो आणि सुसंस्कृत समाजामुळे एका देशाची ओळख जगात महान राष्ट्र म्हणून होते. भारतात ही परंपरा फार प्राचीन आहे, अनेक चिरकाल प्रासंगिक राहणारे साहित्य भारतातील थोर साहित्यिकांनी लिहिले आणि समाज घडविला, म्हणून ग्रंथांनी या देशाला घडविण्याचे महान काम केले आहे असेच म्हणावे लागेल परंतु ही परंपरा खंडित होऊ नये याची काळजी आजच्या तरुणींनी घेतली पाहिजे म्हणून खूप पुस्तक वाचली पाहिजे. त्यासोबतच पुस्तकं लिहिली पाहिजे, असे सांगितले. तसेच त्यांनी माणसाचे अनेक गुण सांगितले त्यात अष्ठपैलू, शतपैलू, सहस्त्रपैलू, असे व्यक्तिमत्व असतात आणि ते कसे घडतात हे सांगताना त्यांनी दोन कथा आपल्या मूळ कथन शैलीत सांगून सर्व जिल्हाभरातील विविध महाविद्यालयातून आलेल्या दीडशेच्या वर सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. असे आगळे वेगळे कथाकार व. पु. यांची ३० जानेवारी रोजी फैजपूर येथील मैत्री शिबीरात एक वेगळी ओळख घडली.
दिवसभरात डॉ. गणपत ढेंभरे यांचे मैत्री समाजाची, डॉ.जगदीश पाटील यांचे मैत्री नवीन शैक्षणीक धोरणाशी, प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे यांनी मैत्री कशी आणि कोणाशी अशा विषयांवर शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सायंकाळी सर्व प्रा. प्राजक्ता काचकुटे, प्रा. चेतना नेहते, प्रा. शेरशिंग पाडवी, डॉ. ताराचंद सावसाकडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक नाटक, गीत, गजल, सामुह नृत्य इत्यादि कार्यक्रम सादर केले.
सर्व सत्रांचे सूत्र संचालन व आभार उपस्थित विद्यार्थिनींनी मानले.
प्रसंगी प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुडदे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जयश्री पाटील, प्रा. अचल भोगे, प्रा. शिवाजी मगर, प्रा. प्राजक्ता काचकुटे, प्रा. चेतना नेहते, यांनी परिश्रम घेतले.
धनाजी नाना महाविद्यालयात मैत्री शिबिर
10 months ago
No Comments