भुसावळ, दत्तात्रय गुरव | श्रावण मासानिमित्त शहरातील भाविकांसाठी ‘भुसावळ ते पंढरपूर’ अशा एकूण तेरा लक्झरी बसच्या मोफत प्रवासाची सुविधा पिंटू ठाकूर यांनी करून दिली आहे. या बसेस आज भुसावळहून पंढरपूरकडे रवाना होतांना खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी त्यास हिरवा झेंडा दाखवला.
श्रावण मास म्हणजे व्रतवैकल्य करण्याचा माहिना होय. या महिन्यांमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात व्रतवैकल्य, पूजा अर्चा करतात. ‘शहरातील भाविकांना पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घडावे.’ या उद्देश्याने भुसावळ शहरातील पिंटू कोठारी यांनी तेरा लक्झरी बसमधून भाविकांना प्रवासाची मोफत सोय करून दिली आहे.
श्रावण या पवित्र महिन्यात पंढरीला जाता येत असल्याने आंनद झाला आहे. याप्रसंगी भाविक हरिनामाचा जयघोष करत भजन, फुगड्या खेळत भक्ती रसात तल्लीन झाले. या लक्झरी बसला खासदार रक्षा खडसे आणि आमदार संजय सावकारे यांनी हिरवा झेंडा दाखवला.