सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत प्रशिक्षण

army

 

जळगाव (प्रतिनिधी) संघ लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचेमार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी 8 सप्टेंबर, 2019 रोजी घेण्यात येणा-या कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परिक्षेकरीता 12 जून, 2019 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज (रोजगार समाचार) मध्ये जाहिरात प्रसिध्द होणार आहे. संघ लोकसेवा आयोगाकडे ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 8 जुलै, 2019 अशी आहे. ऑनलईन अर्ज भरणेसाठी http:/www.upsconline.nic.in या वेबसाईटचा वापर करावा. कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परिक्षेव्दारा कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशन साठी निवड करण्यात येते.

कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवुवतीसाठी 18 जून, 2019 ते 31 ऑगस्ट, 2019 या कालावधीत कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे 13 जून, 2019 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेब साईट www.mahasainik.com वरील रिक्रुटमेंट टॅब (Recruitment Tab) ला क्लीक करुन किंवा गुगल प्लस मध्ये पीसीटीसी ट्रेनिंग PCTC Training असे सर्च करुन त्यामधील CDS- 58 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड, नाशिक यांचा दुरध्वनी क्र. 0253-2451031 आणि 2451032 यावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Add Comment

Protected Content