यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली येथे एसएससी/पैरा मिलिट्री (स्टाप सिलेक्शन कमिशन) भर्तीची पुर्व तयारी करिता लेखी प्रशिक्षण सराव कार्यक्रम विनामुल्य गावात आज सकाळी १० वाजता सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन यावलचे तहसीलदार महेश पवार यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार महेश पवार यांनी उपस्थित गावातील व परिसारातिल परीक्षार्थी युवकांना प्रतियोगिता स्पर्धा करिता तयारी बद्दल अनमोल असे मार्गदर्शन करून अशा प्रतियोगितेचे आयोजन राज्यपातळी सह तालुका पातळीवर ही झाल्या पाहिजे व ग्रामीण भागात असे प्रकारचे आयोजन केले. याबद्दल सैनिक महेंद्र पाटील सोबत आयोजकांचे विशेष कौतुक केले. तसेच यावेळी सैनिक महेंद्र पाटील यांनी विरावली गावात कोणतेही मोबाईलचे रेंज नसले कारणाने गावातिल विद्यार्थी हे सोशल नेटवर्किंगचे माध्यमातुन प्रतियोगिता स्पर्धाची तयारी तसेच सद्या कोवीड १९च्या प्रार्दुभावा मुळे सुरु असलेल्या ऑनलाईन शालेय अभ्यासक्रम हा नीट करू शकत नाही, असे सांगुन आमचे विरावली गावात मोबाईल रेंज उपलब्ध करून देणे बाबत विनंती केली.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित प्रा. संदीप सोनवणे, स्वयदिप क्लासेस जळगांव यांनी आजच्या सत्रात गावातिल व परिसरातील उपस्थित परीक्षार्थी एसएससी कांस्टेबल जीडीच्या लेखी परीक्षाला येणाऱ्या अडचणी बद्दल खूप अत्यंत आवश्यक असे बहुमुल्य अनमोल असे मार्गदर्शन केले. परीक्षार्थींचे शंकांचे समाधान करून परीक्षार्थी ना प्रश्नपत्रिकाचा मॉडल समजावुन सांगितले आणि खूप अनमोल असे मार्गदर्शन केले. हा उपक्रम नियमित सुरु आहे, यात कोरपावली गावातील विध्यार्थी आज पासुन या परिक्षेत शामिल झाले आहेत.