जळगावात रोटरी ईस्टतर्फे विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक अन हॅन्ड सर्जरी शिबिराचे आयोजन

doctors symbol

जळगाव, प्रतिनिधी | येथील रोटरी ईस्ट आणि स्व.अण्णासाहेब जे.के.पाटील यांचे स्मरणार्थ विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हॅन्ड सर्जरीच्या मोफत शिबिराचे आयोजन दि.१ व २ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.

 

रोटरी ईस्टतर्फे गेल्या १० वर्षांपासून दरवर्षी विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हॅन्ड सर्जरीच्या मोफत शिबिराचे आयोजन केले जाते. यंदाही दिनांक १ आणि २ फेब्रुवारी रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. खालील सर्व सर्जरीसाठी मुंबईचे विख्यात प्लस्टिक सर्जन डॉ. पंकज जिंदाल पुणे, डॉ. शंकर सुब्रमण्यम मुंबई आणि डॉ. अविनाश येळीकर औरंगाबाद, डॉ. अमित वराडे नासिक (हॅन्ड सर्जन) हे सर्व मान्यवर डॉक्टर्स आपली सेवा देणार आहेत.

या शिबिरात जळालेले हात पाय किंवा व्यंग, जन्मतः हाताचे पायाचे किंवा शरीरावरील इतर व्यंग किंवा जुळलेली किंवा वाकडी बोटे, ओठ किंवा कमी-जास्त प्रमाणात वाढलेली हात पायाची बोटे,चेहऱ्यावरील मस, वाकडे वाण, मुरुमांमुळे चेहऱ्यावरील खड्डे, न पसरणारे कोड, टाळूवरील वाकडे नाक, कानाचे भाग, हनुवटीवरील आकारात झालेले बदल, अपघाताने विकृत झालेले अंग अशा प्रकारांवर शस्त्रक्रिया करण्यात येतील.

या शस्रक्रियांसाठी इच्छुक रुग्णांनी पुढील ठिकाणी नावनोंदणी करायची आहे. विनोद इंजिनियरिंग ,स्टेडियम कॉम्प्लेक्स जळगाव, डॉ. अशोक पाध्ये भास्कर मार्केट जळगाव, डॉ. वैजंती पाध्ये डेंटल क्लिनिक पाचोरा, डॉ.जगमोहन छाबडा पारीख पार्क गार्डनसमोर जळगाव, डॉ.अमेय कोतकर आर.आर.शाळेजवळ जळगाव, शशी बियाणी कृषी बाजार समिती जळगाव, डॉ.गोविंद मंत्री नंदिनीबाई महिला कॉलेजसमोर जळगाव या शिबिराचा जास्तीतजास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी ईस्टचे अध्यक्ष विनोद भोईटे पाटील यांनी केले आहे.

Protected Content