महिला व मुलींसाठी उद्यापासून मोफत कराटे प्रशिक्षण

Free karate training for women and girls from tomorrow

खामगाव प्रतिनिधी । देशसह राज्यभरातील महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून या घटनांना आळा बसावा, म्हणून खामगाव श.पो.स्टे, स्वराज्य फाउंडेशन, बुलडाणा डिस्टीक जेनसुरयो कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.14) उद्यापासून महिलांसह मुलींनी स्वतःचे संरक्षण करता यावे, यासाठी मार्गदर्शनपर मोफत कराटे शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय नांदुरा येथे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या दि.14 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता कराटे शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटन शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील हे उपस्थिती राहणार आहेत. यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य अनुराधा भावसार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, खामगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अबुंलकर, कराटे परिक्षक चिफ इन्सट्रक्टर सेंपाई सुरज खंडेराव
हे हेही उपस्थिती राहणार आहेत. या मोफत शिबीराचा जास्तीत जास्त संख्येने महिला व मुलींनी लाभ घ्यावा, असे आवाहन येथील शहर पोलीस प्रशासन व स्वराज्य फाऊंडेशन, खा.बुलडाणा डिस्टीक जेनसुरयो कराटे असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या महिला व मुलींना विद्यार्थिनींना मोफत कराटे शिबिराचा लाभ घ्यायचा असले त्यांनी तेजल (7821811721) साक्षी (7620500893), वृषाली-(8857046445) या नंबर संपर्क करून आपल्या नावाची नोंद करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

Protected Content