यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक सद्गुरु परमपूज्य मोरे यांचा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट,श्री स्वामी समर्थ सेवा खंड दिंडोरी प्रणित शाखा यावल यांच्या संयुक्त विद्यमानाने यावल तालुक्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबीर व मोफत आरोग्य तपासणी नाडीदोष परीक्षण तसेच सर्व रोग निदान शिबिर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे यात रक्तदाब, मधुमेह ,डायबिटीज सर्व प्रकारचे कॅन्सर, साध्याचे विकार, कावीळ ,त्वचा विकार ,वाद विकार, पोटाचे विकार, महिलांचे विकार, मुतखडा, मुळव्याध ,लहान मुलांचे, विकार मनोविकारे इत्यादी विकारांचे रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
यावल तालुक्यातील शिबिरांची रूपरेषा गुरुवार तीन ऑक्टोंबर रोजी यावल येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र माधवनगर टेलीफोन ऑफिस जवळ, शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी राम मंदिर नायगाव येथे, शनिवार पाच ऑक्टोबर रोजी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चिंचोली, रविवारचा ऑक्टोंबर विकास सोसायटी मेन चौक बस स्टॅन्ड डांभुर्णी, ७ ऑक्टोबर सोमवार रोजी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भवानी माता मंदिर जवळ साकळी तालुका यावल, मंगळवार ८ ऑक्टोंबर रोजी श्री दत्त मंदिर अट्रावल तालुका यावल, ९ ऑक्टोंबर बुधवार रोजी फैजपूर, १०आक्टोंबर गुरुवार रोजी न्हावी येथे यावल तालुक्यात विविध ठिकाणी शिबिर आयोजन करण्यात आले आहे. याचा भावी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक सद्गुरु परमपूज्य गुरू माऊली अण्णासाहेब मोरे यांचा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट केले आहे.