यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वनविभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वनविभागाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
यावल येथे आयोजीत या मोफत आरोग्य तपासणी शिबीरास ऋषीकेश रंजन वनसंरक्षक धुळे वनवृत्त धुळे आणि ए.आर. प्रविणकुमार उप वनसंरक्षक, यावल वनविभाग जळगांव महोदयांचे मार्गदर्शनाखाली स्पार्कस लाईफ केअर घाटकोपर मुंबई या संस्थेतर्फे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, लेखापाल, वनरक्षक अधिसंख्य वनमजुर आणि रोजंदारी वनमजुर असे एकूण ११२ वन अधिकारी, वनकर्मचारी यांचे शरीराचे शुगर, बीपी, रक्त, हृदय, किडनी,वात, पित्तअसे विविध ८४ प्रकारच्या मोफत आजारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आले. तसेच औषधोपचार आणि खाण्याचे पदार्थ या बाबत सल्ला, मार्गदर्शन डॉ.सुनिल बारगे, डॉ.मधुकर आव्हाड, डॉ. विश्वास पवार डॉ.कल्पेश सोले,डॉ.श्रीमती वैशाली गवाले, डॉ. मदन पिसे, डॉ.नईमुद्दीन मल्लीक आणि एस.के.राकेश यांनी केले.हे शिबीराचे कार्यक्रम प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व, सुनील भिलावे वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिमअजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांचे उपस्थितीत झाला.या शिबीर कार्यक्रमाचे नियोजन विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांनी केले.