अमळनेर (प्रतिनिधी) येथील पुज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने उदया रविवारी (दि.१७) सकाळी ९.०० ते दुपारी १.०० दरम्यान एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनीं त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक विजयसिंह पवार यांनी केले आहे.
तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, रेल्वे भरती, आरोग्य विभाग, पशू संवर्धन विभाग व पोलीस अधिकारी पदाच्या पूर्व परीक्षांसाठी एक दिवसाचे मोफत मार्गदर्शन यावेळी केले जाणार आहे. जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशनचे प्रा.खेमचंद्र पाटील हे स्पर्धा परीक्षा, गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.