पाचोरा, प्रतिनिधी | शहरातील अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशा विघ्नहर्ता मल्टिप्लेक्स हॉस्पीटलमध्ये येथील नगरपालिकेतर्फे दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत DAY NULM स्वस्थ SHG परिवार कार्यक्रमांतर्गत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना पोषण आहार आरोग्य तपासणी भव्य रोगनिदान शिबिराचे अयोजन केले होते.
हे शिबीर विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज (दि.२७) सकाळी १०.०० ते ३.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले. या शिबिरात सेवा देण्यासाठी विघ्नहर्ता मल्टिप्लेक्स हॉस्पीटल मधील डॉ. भूषण मगर (एम.बी.बी.एस. टी.डी.), डॉ.एम. स्वामी (एम.डी.डी.एम. हृदयरोग तज्ञ), डॉ. सागर गरुड (एम.बी.बी.एस.), डॉ.रोटे (एम बी.बी.एस., डी.एन.मेडीसीन फिजिशियन) डॉ. राहुल पटवारी (एम.बी.बी.एस., डी.एन.बी.बालरोगतज्ञ ) डॉ.संदीप इंगळे (एम.बी.बी.एस., डी.एन.बी.) डॉ.प्रीती मगर (एम बी.बी.एस., डी.सी.एच), डॉ. अनुजा देशमुख (एम.एस.ओ.बी.जी. & स्त्री रोगतज्ञ), डॉ.प्रवीण देशमुख (एम.बी.बी.एस.ओर्थ अस्थी रोगतज्ञ) हे डॉक्टर्स उपस्थित होते.
विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयास महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेस शासनाकडुन मान्यता मिळाली असून मोठ-मोठ्या ऑपरेशन्ससाठी ग्रामिण भागात आरोग्य सुविधेसाठी गोर-गरिब रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या योजनेस सुरवात झाली असून आरोग्यासाठी जास्त खर्च लागतो, अशी भीती मनातून काढून टाका आणि आरोग्यकडे काळजीपूर्वक लक्ष द्या असा सल्ला डॉ. मगर यांनी रुग्णांना दिला. या शिबिरात पाचोरा तालुक्यातील ग्रामीण व शहरात आठशे ते हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीरात अनेक रुग्णांना टायफॉईड, कावीळ, थंडी तापासह विविध आजारांची लागण झाल्याचे दिसून आले. रुग्णांनी वातावरणानुसार आरोग्याची काळजी घेणे, गरजेचे असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. शिबीरात रक्त लघवी तपासणी ई. सी.जी .डोयबीटीस शुगर बीपी अश्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, गुडघेदुखी, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, टायफॉईड व स्त्रीयांना होणारे विविध आजार, वयोवृध्दांना योग्य मार्गदर्शन देऊन मोफत औषधोपचार करून आरोग्य शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले.