जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलसमध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (SDS) या परिक्षेची पुर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराट्रातील नवयुवक व नव युवतीसाठी दिनांक 10 जून 2024 ते 23 ऑगस्ट, 2024 या कालावधीत CDS कोर्स क्रमांक 63 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण निवास व भोजन दिले जाते. तरी जळगाव जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे दिनांक 6 जून, 2024 रोजी मुलाखतीस हजर राहावे, मुलाखतीस येते वेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune( DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील CDS – 63 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
सदर सि. डी. एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमुद पात्रता असणे आवश्यक आहे व त्या संबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत – उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सि. डी. एस (CDS) या परीक्षेकरिता ऑनलाईन व्दारे अर्ज केलेला असावा. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या ईमेल आय डी training.petcnashik@gmail,com व दुरध्वनी क्रमांक 0253-245 1032 किंवा व्हाटसॲप क्रमांक 9156073306 (प्रवेशपत्र मिळवण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.