भुसावळ, प्रतिनिधी | महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांच्या मदतीने शिवलेल्या कापडी पिशव्या आज (दि.२९) येथील न.पा. शाळा क्रमांक-१ व डी.एस. विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात आल्या.
यावेळी प्लास्टिक बंदीविषयी जागृती करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचे सहकार्य लाभले. जिल्हा समन्वय अधिकारी शेख अतिक व श्री. वावडे, विजय स्वामी, कविता जोगी हे यावेळी उपस्थित होते.