जळगाव प्रतिनिधी । ईद-ए-मिलादनिमित्त सैय्यद नियाज अली भैय्या फाऊंडेशनतर्फे जिल्ह्यातील आदिवासी वस्ती व तांड्यावरील गरीब गरजूंना थंडीपासून बचाव राहण्यासाठी १ हजार २०० ब्लँकेटचे मोफत वाटप करण्यात येत आहे. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्त हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी विभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत गवळी यांची उपस्थिती होती.
ईद -ए- मिलादुन्नबी ही इस्लामी कॅलेंडरच्या ‘बारा रबिऊल अव्वल’ला साजरी होते म्हणूनच १२ या आकड्याला शुभ मानून यावर्षी १ हजार २०० ब्लँकेटचे वाटप करण्यात येत आहे. या गाडीसोबत सैय्यद नियाज अली भैय्या फाऊंडेशनचे सदस्य गरजू गरीब लोकांपर्यंत स्वतः जाऊन आपल्याहस्ते ब्लँकेटचे योग्य रित्या वाटप करून समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवून गरजू गरीब लोकांना ब्लॅंकेटद्वारे मायेची ऊब देतील.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी साहेब, फाउंडेशनचे अध्यक्ष सैय्यद अयाज अली नियाज अली, नायब तहसीलदार योगेश नन्नावरे, ॲड. सागर चित्रे, रियाज अली नियाज अली, नाझिम पेंटर, शफी ठेकेदार, राहुल चौधरी, सय्यद जावेद, इलियास नूरी, शेख नजिर, इम्तियाज अली, शेख सलमान, शफीक शेख यांच्यासह आदी उपस्थित होत.