खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मानवी डोळ्यांच्या अनेक समस्या असतात. त्यात अस्पष्ट दिसणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळे सुजणे, एकच इमेज दोनदा दिसणे, रंग फिक्के नजर येणे, मंद उजेडदेखील प्रखर वाटणे, मध्ये काळा स्पॉट व आजूबाजूला लाईट दिसणे, रात्री कमी दिसणे, पुन्हापुन्हा लवकर लवकर चष्म्याचा नंबर बदलणे अशा अनेक समस्या असतात. त्यांचे निदान करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही रोटरी क्लब खामगांव आणि विदर्भातील सर्वात मोठे नेत्र रुग्णालय दमाणी नेत्र रुग्णालय अकोला यांनी संयुक्तपणे नि:शुल्क मोतीबिंदु तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते.
सदर आयोजन गुरुवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०९ ते दुपारी ०१ वाजेपर्यंत वाडी येथे इंडियन मेडिकल असोशिएशनच्या (आय.एम.ए.) हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे रोटरी क्लबचा हा २०२३-२४ या वर्षीचा जुलैपासून पांचवा कॅम्प होता आणि आतापर्यंत एकूण ७८० रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे आणि शस्त्रक्रियेसाठी २१५ रुग्णांची निवड झालेली आहे व त्यापैकी ब-याच जणांनी दमाणी नेत्र रुग्णालय अकोला येथे जाऊन शस्त्रक्रिया करवून घेतलेली आहे.
शिबिरात दमाणी नेत्र रुग्णालय अकोला येथील डॉ. दत्ता पाटील, डॉ. तेलगोटे मॅडम आणि त्यांचे सहकारी श्री अजय देशमुख यांनी सुमारे ११६ रुग्णांची तपासणी केली आणि शस्त्रक्रियेसाठी २८ रुग्णांची निवड केली आहे. त्यांना पुढील तारीख देऊन त्यांची अकोला येथे नाममात्र ३००/- रुपयात शस्त्रक्रिया करण्यात येईल.
दमाणी नेत्र रुग्णालयासोबत रोटरी निरंतर २०१५-१६ पासून कार्य करीत आहे व आजपर्यंत रोटरी क्लब खामगांवने ६११ रुग्णांची शस्त्रक्रिया घडवून आणलेली आहे. खुद्द दमाणी नेत्र रुग्णालयाने आजपर्यंत अडीच लक्षांहून जास्त रुग्णांची शस्त्रक्रिया पार पाडलेली आहे. उल्लेखनीय बाब हि आहे की शस्त्रक्रियेसाठी ज्या रुग्णांची यावर्षी निवड झालेली आहे, त्यांचा सर्व खर्च दरवर्षीप्रमाणे यंदाही सुप्रसिद्ध उद्योगपती श्री उत्तमचंदजी गोएनका हे प्रायोजित करणार आहेत.
स्थानिक सिल्व्हरसिटीचे डॉ गौरव गोएनका व सनदी लेखापाल सीए अपूर्व देशपांडे यांच्या नेतृत्वात सर्व रुग्णांसाठी असंसर्गजन्य रोग निदान कॅम्पचे देखील आयोजन केले होते. यामध्ये कर्मचारी श्रीमती रिया सिरसाट व श्रीमती सुरेखा मॅडम यांच्या चमूने तपासणीमध्ये सहकार्य केले. सदर शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रकल्पप्रमुख रो देवेश भागात, सह-प्रकल्पप्रमुख रो राजीव शाह, सह-प्रकल्पप्रमुख रो संकेत धानुका, रो परमानंद नागराणी, रो सतीश भट्टड, रो नकुल अग्रवाल यांचेसह अनेक रोटरी सदस्यांनी तसेच वाडी गावातील निवासी श्री संदीप जोशी, श्री दत्ताभाऊ जवळकार, श्री अजय खोन्द्रे, श्री नेमाने भाऊ, श्री शिवाभाऊ सपकाळ, श्री सोपान जवंजाळ, श्री संजय डोंगे यांचेसह अनेकांनी अथक परिश्रम घेतले. रोटरी क्लब अध्यक्ष रो सुरेश पारीक व रोटरी क्लब सचिव रो आनंद शर्मा यांनी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल इंडियन मेडिकल असोशिएशनच्या पदाधिका-यांचे आणि मदत केल्याबद्दल क्लबतर्फे सर्वांप्रती आभार व्यक्त केलेले आहेत.