वेगवेगळे आमिष दाखवत फसवणूक करणारा जेरबंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे अमिष दाखवित जळगावातील पवन बळीराम सोनवणे यांची १५ लाखांची फसवणुक झाली होती. तांत्रिक विश्र्लेषणावरुन श्रीनगर व मुंबई येथून राकेश मिश्रा याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ऑनलाईन फ्रॉडसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.

 

सोशल मीडियावर नागरिकांना बाहेरील देशातील कोड क्रमांवरुन मॅसेज प्राप्त होत असून त्यांना कोणीतीही गुंतवणुक न करता दररोज पाचशे ते हजार रुपये कमवा असे मॅसेज येत आहे. त्यानंतर नागरिकांना विविध टास्क देवून त्यांच्या बँकेमध्ये पाचशे ते पाच हजार पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पाठविले जातात. त्यानंतर पुन्हा प्रिपेड टास्क टास्क देवून त्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि त्यावर त्यांना कमीशन देखिल दिले जाते. तसेच क्रिप्टो करन्सीत त्यांनी गुंतवणूक केल्यास त्यावर मोठा प्रमाणात नफा मिळत असल्याचे सांगून बनावट क्रिप्टो करंन्सी ट्रेडिंग वेबसाईटवर यूजर आयडी तयार केले जाते. या अमिषाला जळगावातील पवन बळीराम सोनवणे हे बळी पडले. त्यांनी सात विविध बँकांमध्ये सुमारे १५ लाख ३५ हजार रुपये भरुन क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणुक केली होती. दरम्यान, त्यांना आपली फसवणुक झाल्याचे कळताच त्यांनी लागलीच याबाबतची तक्रार सायबर पोलीसात दिली होती. त्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्याचे सायबर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक विश्र्लेषण केले. यात पवन सोनवणे यांनी ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले होते. ती खातील देशातील विविध राज्यांतील असल्याचे उघड झाले. त्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने श्रीनगर येथून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मुंबईतील एका संशयिताची माहिती दिली. पथकाने मुंबई येथून राकेश मिश्रा या ठगाच्या मुसक्या आवळल्या.

Protected Content