भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्याच्या केळीच्या मालाचे १ लाख ७४ हजार रूपये न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, “राजेंद्र भिकनसिंग पाटील (वय-५७) रा. वडगाव मुलाने, ता. पाचोरा हे शेतकरी असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी केळी व्यापारी जाफर शेख बागवान रा. कजगाव ता. भडगाव यांना ३१ ऑक्टोबर २०२० पासून ते १२ डिसेंबर २०२० दरम्यान वेळोवेळी केळी पिकाचे माल विकला होता. शेतकरी राजेंद्र पाटील यांचे १ लाख ७४ हजार ७०२ रूपये अद्यापपर्यंत व्यापारी जाफर शेख यांनी दिले नाही.
वारंवार संपर्क करूनही व्यापाऱ्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर शेतकरी राजेंद्र पाटील यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून व्यापारी जाफर शेख याच्या विरोधात भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि चंद्रसेन पालकर करीत आहे.