केवायसीच्या नावाखाली एकाची ७४ हजार रूपयात फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणपती नगरात राहणाऱ्या एकाला मोबाईल सीमकार्ड केवायसीच्या नावाखाली ७४ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यशोधन अरूण व्यवहारे (वय-४६) रा. गणपती नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवार २७ जानेवारी रेाजी सायंकाळी ५ वाजता ते घरी असतांना त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मोबाईल समिकार्ड च्या केवायसीच्या नावाखाली कागदपत्रांची पुर्तता करण्याचे सांगून कस्टमर केअरला संपर्क साधण्याचे सांगितले. त्यानुसार यशोधन व्यवहारे  यांनी लागलीत दिलेल्या नंबरवर संर्क साधला असता अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर १० रूपयाचे रिचार्ज करण्याचे सांगितले. यासाठी एक ॲपर डाऊनलोड करण्याचे सांगितले. व्यवहारे यांनी ॲप डाऊनलोड केले व १० रूपयाचे रिचार्ज केला. रिचार्ज केल्याने त्यांच्या बँक खात्यातून १० रूपये कट झाले. काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून पाच वेळा पैस कट झाल्याचे मॅसेजेस आले.  त्याची बँक डिटेल तपासले असता व्यवहारे यांच्या बँकखात्यातून एकुण ७४ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे दिसून आले. त्यांनी तातडतीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.

Protected Content