जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बजाज फायनान्सद्वारे मोबाईल घेवून हप्त्याचे पैसे न भरता एकाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मुस्तफा शेख इब्राहिम (वय-४१) रा. मेहरूण दत्तनगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शाफिक शेख कासम रा. काट्याफाईल, शनीपेठ, जळगाव यांची शेख मुस्तफा याच्याशी झाली. त्यानंतर शेख मुस्तफाचा विश्वास संपादन करून शाफिक शेख याने शेख मुस्तफाच्या नावावर बजाज फायनान्सद्वारे २५ हजार ९९० रूपये किंमतीचा मोबाईल ५ जानेवारी २०२२ रोजी खरेदी केला. दरम्यान, बजाज फायनान्सचे हप्ते भरले नसल्याचे शेख मुस्तफा यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार २८ जुलै रोजी रात्री १० वाजता शाफिक शेख कासम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.